मुंबई - सिनेमाच्या सेटवर लैंगिक असंतूलन पाहिले आहे, जिथं हिरोला जास्त चांगले काम आणि इज्जत मिळत असते आणि अधिकतर महिला बचावासाठी मौन धारण करत असतात, असे श्रृती हासनने म्हटले आहे.
श्रृतीने तेलुगु आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. तिचे म्हणणे आहे की, इंडस्ट्रीत अनेक कारणे आहेत की ज्यामुळे तिला बचाव करावा लागतो.
श्रृती म्हणाली, ''माझ्या आडनावामुळे आणि माझ्या चेहऱ्यामुळे अनेक लोकांना मी खटकत होते. कित्येक वर्षानंतर आता मी स्वतःला सुरक्षित असल्याचे समजत आहे.''
तिने सांगितले की, सुरूवातीच्या काळात अनेक छोट्या-छोट्या गोष्टींचा अनुभव योग्य नव्हता.
श्रृती पुढे म्हणाली, ''मी बचावासाठी गप्प राहणे पसंत केले. मला वाटते अनेक महिलांचा असाच अनुभव असेल. ते म्हणायचे पुस्तकं वाचू नका ते योग्य वाटत नाही. खुर्ची पहिल्यांदा हिरोला दिली जाते. अनेकदा मला सेटवर पहिल्यांदा खुर्ची दिली गेली नाही. ते म्हणायचे, अरे हिरो मॉनिटर जवळ आलाय खुर्ची आणा.''
श्रृती हासन 'देवी' या शॉर्ट फिल्ममध्ये झळकली आहे. प्रियंका बॅनर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या या फिल्ममध्ये काजोल मुख्य भूमिकेत आहे.