पुणे - रंगभूमीवरचा नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशान भूमीत अखेरचा निरोप देण्यात आला. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंतिम संस्कार पार पडले. सरकारच्या वतीने मंत्री सुभाष देसाई यांनी श्रद्धांजली वाहिली. कुठले ही धार्मिक विधी न उरकता डॉ. लागुंना अखेरचा निरोप देण्यात आला.
आज सकाळी पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहाच्या परिसरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.असंख्य नाट्यकर्मी आणि सिनेसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ आणि प्रतिभावंतांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. आपल्या लाडक्या नटसम्राटाला डोळे भरुन पाहण्यासाठी ही गर्दी झाली होती.
लागु यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी मनसे अध्यक्ष राज ठाकरे अभिनेते नाना पाटेकर, अमोल पालेकर यांच्यासह मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यदर्शन घेतले. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक जणांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत श्रध्दांजली वाहिली. यावेळी पालिसांच्या वतीने मानवंदना देण्यात आली.
लागु यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी डॉ. श्रीराम लागू यांचे निधन मंगळवारी १७ डिसेंबरला रात्री ८ च्या सुमारास झाले होते. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या बातमीने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली होती. त्यांचा मुलगा आनंद अमेरिकेतून अंत्यदर्शनासाठी परतणार असल्यामुळे अंत्यसंस्कार शुक्रवारी करण्याचा निर्णय लागूंच्या कुटुंबीयांनी घेतला होता.