मुंबई - सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. सर्व प्रकारची कामे बंद असल्यामुळे बॉलिवूड कलाकार घरीच थांबून आहेत. आपल्या चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट लिहित असतात. अभिनेत्री श्रध्दा कपूरची एक पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे. तिने आपला एक फोटो शेअर केलाय. या जुन्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय की, आपले दात सशासारखे होते. श्रध्दाच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
''माझे 'सशा'सारखे दात होते'', श्रध्दा कपूरने फोटो शेअर करीत दिली कबुली - श्रध्दा कपूर
अभिनेत्री श्रध्दा कपूरने सोशल मीडियावर आपले काही जुने फोटो शेअर केले आहेत. यात तिने आपले दात सशासारखे होते, असे लिहिलंय. तिच्या चाहत्यांनी तिला उत्स्फुर्त प्रतिसाद दिलाय.
अभिनेत्री श्रध्दा कपूर
श्रध्दा कपूर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपली सामाजिक मतेही ती मांडत असते.
कामाच्या पातळीवर तिच्यासाठी २०२० हे वर्ष खूप चांगले होते. यावर्षी तिचे दोन चित्रपट रिलीज झाले. यात स्ट्रीट डान्सर आणि बागी ३ या चित्रपटांचा समावेश होता.