महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'स्ट्रीट डान्सर'च्या सेटवर श्रद्धा कपूरला वाढदिवसापूर्वीच मिळाले सरप्राईझ - स्ट्रिट डान्सर

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा वाढदिवस ३ मार्च रोजी असतो. यावर्षात तिचे बरेचसे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'स्ट्रिट डान्सर', 'साहो', 'बागी-३' आणि सायना नेहवालच्या बायोपिकसाठी तिची वर्णी लागली आहे. सध्या ती स्ट्रिट डान्सरच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटाच्या सेटवर तिला अनोखे सरप्राईज देण्यात आले.

स्ट्रीट डान्सर

By

Published : Mar 2, 2019, 8:03 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा वाढदिवस ३ मार्च रोजी असतो. यावर्षात तिचे बरेचसे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'स्ट्रिट डान्सर', 'साहो', 'बागी-३' आणि सायना नेहवालच्या बायोपिकसाठी तिची वर्णी लागली आहे. सध्या ती स्ट्रिट डान्सरच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटाच्या सेटवर तिला अनोखे सरप्राईज देण्यात आले.

सोशल मीडियावर तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचा खास व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. केक कापून तिने चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत वाढदिवस साजरा केला.


'स्ट्रिट डान्सर' हा चित्रपट 'एबीसीडी' चित्रपटाचा तिसरा भाग आहे. या चित्रपटात वरूण धवन मुख्य भूमिका साकारतोय. वरूणने श्रद्धासोबत 'एबीसीडी-२'मध्येही भूमिका साकारली होती. 'स्ट्रिट डान्सर' हा चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होईल.


अलिकडेच श्रद्धाने 'साहो' चित्रपटातीलही एक व्हिडिओ शेअर केला होता. तिच्या वाढदिवशी म्हणजे ३ मार्चला या चित्रपटाचा दुसरा टीजर प्रदर्शित होणार असल्याची तिने माहिती दिली होती.
श्रद्धासाठी २०१८ हे वर्षदेखील यशस्वी ठरले होते. तिच्या 'स्त्री' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता. या चित्रपटात तिने राजकुमार रावसोबत स्क्रिन शेअर केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details