मुंबई - कलर्स मराठी अवॉर्ड २०२० हा सोहळा कुटुंबाचा, उत्सव आपुलकीचा या टॅग-लाईनने प्रसारित होत आहे. नेहमीप्रमाणे स्टार्सच्या मांदियाळीत ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहमध्ये मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. सध्या कोरोनाचे संकट सर्वांच्या डोक्यावर आहे फिरत आहे व पुन्हा ते गडद होताना दिसते आहे. म्हणूनच सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत आणि योग्य ती काळजी घेत सोहळ्याच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला.
कलर्स मराठी अवॉर्ड शोसाठी उपस्थित राहिलेले मान्यवर या सोहळ्याच्या शूटिंगला सुरुवात होण्याआधी जवळपासचा परिसर, मेकअप रूम्स, सेटचे सॅनिटायझेशन करण्यात आले. रेड कार्पेटवर या वेळेस अनेक कलाकारांनी हजेरी लावली. त्यांनाही कोरोनासंबंधित कार्यवाहीतून जावे लागले. हा सोहळा अनेकविध कार्यक्रमांनी नटलेला असून तारेतारकांनी केलेल्या धमालमस्तीने भरलेला आहे. सुपरफास्ट कॉमेडी एक्स्प्रेसमधील प्रेक्षकांचा लाडका सुमित राघवन याने आपली पत्नी चिन्मयी सुमितसोबत सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली. मराठी टेलिव्हीजन, वायाकॉम18 चे प्रमुख दीपक राजाध्यक्ष आणि रिजनल एंटरटेन्मेंट हेड रवीश कुमार, ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाची सूत्र संचालक स्पृहा जोशी, परीक्षक अवधूत गुप्ते, ‘सुखी माणसाचा सदरा’ मालिकेतील अभिनेत्री रोहिणी हट्टंगडि, भरत जाधव, श्रुजा प्रभुदेसाई, केदार शिंदे, ‘चंद्र आहे साक्षीला’ मालिकेतील सुबोध भावे (श्रीधर), ऋतुजा बागवे (स्वाती), नक्षत्रा मेढेकर (सुमन), कुंजिका काळविंट, आस्ताद काळे (संग्राम) यांनी हजेरी लावली होती.तसेच ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेतील सुकन्या मोने-कुलकर्णी (अनुपमा), सुयश टिळक (शंतनू), सायली संजीव (शर्वरी), समिधा गुरु (ऐश्वर्या), ‘जीव झाला येडापिसा’ मालिकेमधील चिन्मयी सुमित (आत्याबाई) विदुला चौघुले(सिध्दी) अशोक फळदेसाई (शिवा), मालिकेचा लेखक चिन्मय मांडलेकर, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेतील कलाकार आणि निर्माते लेखक संतोष अयाचित हेदेखील आवर्जून उपस्थित होते. ‘बिग बॉस’ मराठी सीझन दोनचा विजेता शिव ठाकरे, ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेचे निर्माते राकेश आणि संगीता सारंग, अक्षय मुदवाडकर(स्वामी समर्थ), विजया बाबर (चंदा), कृष्णप्पा आणि इतर कलाकार, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील कलाकार समीर परांजपे (अभिमन्यु), अक्षया नाईक(लतिका), संदेश उपशाम (सज्जन), पूजा पुरंदरे (कामिनी), उमेश दामले (बापू), प्रमिती नरके (हेमा), ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेतील शुभांगी गोखले, मनिराज पवार (रणजीत) शिवानी सोनार (संजीवनी), श्वेता खरात (मोनि), श्रुति अत्रे (राजश्री) आणि मालिकेतील इतर कलाकारांनी हजेरी लावली, तसेच ‘सख्खे शेजारी’ कार्यक्रमाचा सूत्र संचालक चिन्मय उदगीरकर, सोनाली खरे, सुरेखा कुडची हेदेखील कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आले होते.
या सोहळ्यामध्ये पुरस्कार कोणी पटकावले, कोणत्या कलाकारांनी कोणत्या गाण्यावर डान्स सादर केला हे प्रेक्षकांना २१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर बघायला मिळणार आहे.