मुंबई-सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमधील अनु - सिद्धार्थची केमिस्ट्री पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. त्यांच निस्वार्थी नातं, एकमेकांमधील विश्वास आणि प्रेम, तसेच एकमेकांच्या मिळालेल्या खंबीर साथीमुळे संकटावर त्यांनी केलेली मात हे सगळ एकदा पुन्हा अनुभवता येणार आहे.
नव्या घटनासोबत... अनु - सिद्धार्थच्या आयुष्यात गोड बातमी येता येता राहून गेली. अनुसमोर सत्य आले की ती कधीच आई होऊ शक्त नाही आणि यामध्ये आता अनुच्या मनात पुन्हा मातृत्वाची भावना जागवण्यासाठी सिद्धार्थ प्रयत्न करतो आहे. हे सगळं सुरू असतानाच आता तत्ववादी कुटुंबात अजून एका सदस्याची एंट्री झाली आहे आणि ती म्हणजे सम्राट तत्ववादी. सम्राटची भूमिका संग्राम समेळ साकारत आहे.
सम्राटने अनु - सिद्धार्थ आणि संपूर्ण तत्ववादी कुटुंबाला एक धक्का दिला, जेंव्हा त्याने सान्वीची ओळख त्याची बायको म्हणून करून दिली. सान्वी आणि सम्राटच्या येण्याने आता मालिकेमध्ये पुढे काय बघायला मिळणार आहे ? सान्वी बदली आहे का ? कुठली नवी खेळी ती खेळणार आहे ? अनु - सिद्धार्थ तिच्यावर पुन्हा विश्वास ठेऊ शकतील ? हे बघणे रंजक असणार आहे.
भूमिकेविषयी बोलताना संग्राम समेळ म्हणाला, ‘मला खूप वर्षांपासून मंदार देवस्थळी यांच्यासोबत काम करायची इच्छा होती... त्यांची काम करण्याची पध्दत अप्रतिम आहे. आणि सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेद्वारे ती संधी मिळाली... त्यामुळे जेंव्हा मला कॉल आला तेंव्हापासूनच मी सम्राटची भूमिका करण्यासाठी खूप उत्सुक होतो. लॉकडाउननंतर चांगली सुरुवात आहे, चांगल काम करण्याचा प्रयत्न आहे आणि आशा आहे रसिक प्रेक्षकांना ते आवडेल”. आता सम्राट तत्ववादीच्या एंट्रीमुळे मालिकेत कोणत नवीन वळण येत ते पाहणं मोठं इंटरेस्टिंग ठरणार आहे.