मुंबई - पृथ्वी थिएटर मध्ये कार्यरत असलेल्या आणि अनेक हिंदी आणि इंग्रजी नाटकात काम केलेली अभिनेत्री शिवानी टाकसाळे ही देखील आजच्या मोर्चात सहभागी झाली होती. यावेळी तिने तिच्या विचारांना ई टीव्ही भारतच्या माध्यमातून तिने आपल्या वाट मोकळी करून दिली.
माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं अशी मानवतेची मूलभूत शिकवण आहे. आपण सगळे समान आहोत, धर्म हा फक्त आपल्या वैयक्तिक आचरणाचा भाग आहे. मग जर लोकांच्या मनात अस काही एक नसताना कायद्याच्या माध्यमातून या रेषा दाट करण्याचा प्रयत्न राजकारणी मंडळी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी करत आहेत आणि तो डाव हाणून पाडण्यासाठी आज आम्ही इथे जमलो आहोत.
सीएए आणि एनआरसीबद्दल बोलताना अभिनेत्री शिवानी टांकसाळे दुसरी बाब एनआरसीची आणि ती म्हणजे या देशात एकदा जन्माला येऊन जन्माचा दाखला घेतला, रेशनकार्ड, आधार कार्ड काढलं त्यानंतरही वारंवार स्वतःच्या नागरिकत्व सिद्ध करायची वेळ आपल्यावर का येते. जर एखाद्या नैसर्गिक आपत्ती दरम्यान काही महत्वाची कागदपत्र हरवली असलीत तर श्रीमंत एकवेळ पैसे मोजून ती परत मिळवेळ सुद्धा मात्र गरीब माणसाने अशावेळी नक्की काय करायचं? फक्त कागदपत्र नाहीत म्हणून त्याने देश सोडून निघून जायचं का..? हे जाचक आहे, अशा कायद्याची अजिबात गरज नाही. हे राजकीय फायद्यासाठी केलेले कायदे असून आपल्याला या देशाची एक नागरिक म्हणून त्याच त्याच गोष्टी वारंवार सिद्ध करत बसण्यात अजिबात इच्छा नाही. त्यामुळेच या कायद्याचा आपण निषेध करत असल्याचं तिने सांगितलं.
या संपूर्ण विषयावर तिने आपली रोखठोक मत खास ई टीव्ही भारताकडे व्यक्त केली आहेत.