मुंबई- 8 ऑगस्ट हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय मांजर दिन म्हणजेच world International Cat Day म्हणून साजरा केला जातो. बिग बॉस स्पर्धक आणि अभिनेत्री शिवानी सुर्वेला मांजरं खुप आवडतात. तिच्याकडे तीन गोंडस मांजरी आहेत. या तीनही मांजरी म्हणजे जणू तिच्या कुटुंबाचा एक भागच आहेत आणि या छोटुकल्या कुटुंबीयांना शिवानी बिग बॉसच्या घरात सध्या किती मिस करत आहे.
आंतरराष्ट्रीय मांजर दिन, बिग बॉस फेम शिवानी सुर्वे आपल्या मांजरांना करत आहे मिस - व्हिडीओ
शिवानीने आपल्या मांजरांच्या मस्तीचे किस्सेही एका व्हिडिओद्वारे सांगितले आहेत. ती आपल्या मांजरांच्या आठवणी सांगते, “माझी तिनही मांजरं माझ्या प्रत्येक प्रोजेक्टच्या सेटवरही आली आहेत. मग ते मुंबई असो की पुणे, माझ्या प्रत्येक आऊटडोअर सेटवर माझी मांजरं माझ्यासोबत असतात.
तिने एका व्हिडिओत सांगितलंय, की माझ्या घरी पहिला तपकिरी रंगाचा बोका आला. ज्याचं नाव आम्ही ब्रुनो ठेवलं. त्यानंतर काळी-पिवळी आणि तपकिरी रंगाची मांजरं आली. तिचं नावं माझ्या आईने सखी ठेवलं आणि नंतर पांढरी शुभ्र रंगाची आणखी एक मांजर आली, तिचं नाव स्नो आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ मधला जॉन स्नो पाहून मी त्या मांजरांच नाव स्नो ठेवलं. प्रत्येक मांजराचे स्वभाव-आवाज वेगवेगळे आहेत आणि ते सगळेच शिवानीचे फारच लाडके आहेत.
शिवानीने आपल्या मांजरांच्या मस्तीचे किस्सेही एका व्हिडिओद्वारे सांगितले आहेत. ती आपल्या मांजरांच्या आठवणी सांगते, “माझी तिनही मांजरं माझ्या प्रत्येक प्रोजेक्टच्या सेटवरही आली आहेत. मग ते मुंबई असो की पुणे, माझ्या प्रत्येक आऊटडोअर सेटवर माझी मांजरं माझ्यासोबत असतात. पण बिग बॉसच्या शोचा फॉर्मेटच वेगळा असल्याने मी त्यांना माझ्यासोबत आणू शकले नाही, त्यामुळे त्यांना आता मी मिस करते, असं ती म्हणाली.