‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेतील नवनवीन ट्विस्ट्समुळे ती बरीच लोकप्रिय होतेय. संजू फौजदारीणबाई बनली आणि ढालेपाटलांच्या दारात पुन्हा एकदा लाल दिव्याची गाडी आली. PSI झाल्यापासून तिच्या आयुष्यात बरेच बदल झाले आहेत. पण संजू घर आणि नोकरी या दोन्ही जबाबदार्या उत्तमरीत्या पार पाडताना दिसते आहे. संजू आणि रणजीत ढालेपाटील म्हणजेच शिवानी सोनार आणि मनिराज पवार यांना प्रेक्षकांचे मालिका सुरू झाल्यापासूनच भरभरून प्रेम मिळते आहे. मालिकेतील संजू तिच्या बेधडक आणि बिनधास्त व्यक्तिमत्वासाठी लोकप्रिय आहे.
संजूच्या भूमिकेत असलेल्या शिवानी सोनारच्या शिरपेचात अजून एक तुरा रोवला गेलाय. तो म्हणजे आपल्या भूमिकेसाठी ती फटफटी चालवायला शिकली तीही लगेचच. त्यामुळे ‘राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये संजीवनी रणजीत ढालेपाटील यांचा रुबाब अजूनच वाढलेला दिसतोय. कुटुंब असो वा नोकरी ती तिची जबबाबदारी प्रामाणिकपणे आणि चोखपणे निभावते आहे. मालिका सुरू झाली तेव्हा संजूचा TOKKKK संपूर्ण महाराष्ट्रात फेमस झाला आणि अजूनही फेमस आहे.