मैत्रीच्या नात्याला आयुष्यात खूप वरचे स्थान आहे. त्यामुळेच नाटकं, चित्रपट, मालिकांमधून या भावनेला प्रस्तुत केले जाते. स्टार प्रवाहवरवरील नुकत्याच सुरु झालेल्या ‘मुरांबा’ मालिकेतही हे गोड नातं प्रेक्षकांना बघायला मिळेल. दुपारच्या प्राईम टाइम मध्ये सुरु झालेल्या या मालिकेबद्दल खूप हवा आहे. मालिकेच्या प्रोमोजना प्रेक्षकांचा मिळणाऱ्या प्रतिसादावरून हेच दिसतंय. रमा आणि रेवाच्या मैत्रीचा बंध अनुभवण्यासाठी सारेच उत्सुक आहेत. रमा आणि रेवाच्या मैत्रीचं अतुट नातं मालिकेत पाहायला मिळेलच.
मात्र खऱ्या आयुष्यातही या दोघींची घट्ट मैत्री झाली आहे. एकत्र सीन करता करता या दोघींमधला मैत्रीचा बंध आंबट गोड मुरांब्याप्रमाणेच मुरला आहे. त्यामुळेच सेटवर एकमेकांचे डबे शेअर करण्यापासून सुरु झालेली मैत्री आता आयुष्यातल्या सुख दु:खाच्या गोष्टी शेअर करण्यापर्यंत पोहोचली आहे. मुरांबा मालिकेच्या निमित्ताने रमा आणि रेवाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निशाणी बोरुले आणि शिवानी मुंढेकर पडद्यावरची मैत्री खऱ्या आयुष्यातही जपत आहेत.