मुंबई- 'झी मराठी'वरील 'लागीर झालं जी' या लोकप्रिय मालिकेतील शीतल आणि अजिंक्य प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. शीतल म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर हिचा वाढदिवस नुकताच या मालिकेच्या सेटवर साजरा झाला. वाढदिवसानिमित्त तिच्या सहकलाकारांनी तिला एक खास सरप्राईज दिलं.
आजाने शीतलीला दिलं वाढदिवसाचं खास सरप्राईज - lagir zal ji
याबद्दल बोलताना शिवानी म्हणाली, वाढदिवसाचा दिवस कुटुंबीयांसह साजरा करण्यास मिळावा यासारखा दुसरा आनंद जगात नाही
मालिकेतील यास्मिन आणि शिवानीची हेअरड्रेसर यांनी रात्री बारा वाजता तिला बिल्डिंगच्या टेरेसवर नेलं आणि तिकडे मालिकेची कास्ट आणि क्रू हजर होती. यावेळी पूर्ण टेरेस फुग्यांनी सजवलं होतं. शिवानीने केक कापला आणि कोणालाही त्रास होणार नाही, अशा आवाजात गाणी लावून एक छोटीशी पार्टी केली.
वाढदिवसानिमित्त तिचे आई-वडीलदेखील खास तिला भेटायला मुंबईवरून साताऱ्याला आले होते. शिवानीने त्यांच्यासोबतदेखील वेळ घालवला, काही वेळ शुटींगमधून सुट्टी काढून ती त्यांच्यासोबत महाबळेश्वरला फिरून आली. ज्यानंतर पुन्हा सेटवर आल्यावर सर्व कलाकारांनी शिवानीला केक कापायला सांगितल्याने तिच्यासाठी हे सरप्राईज खूप मोठं होतं. याबद्दल बोलताना शिवानी म्हणाली, वाढदिवसाचा दिवस कुटुंबीयांसह साजरा करण्यास मिळावा यासारखा दुसरा आनंद जगात नाही. तसंच 'लागीरं झालं जी'च्या माझ्या या कुटुंबाने देखील मला खूप मोठं सरप्राईज दिलं आणि हा वाढदिवस मी कधीच विसरू शकत नाही.