महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कोकणातील 'शिमगा' लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर - Nilesh Krishna

शिमगा आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे...येत्या १५ मार्चला हा सिनेमा रिलीज होईल...निलेश कृष्णा यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटातील कोकणातील नामांकित कलाकार झळकत आहेत...

By

Published : Mar 4, 2019, 4:20 PM IST


रत्नागिरी - कोकणातील महत्वाचा सण म्हणजे शिमगा.. हाच 'शिमगा' आता लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. येत्या 15 मार्चला हा 'शिमगा' चित्रपट संपूर्ण राज्यभर प्रदर्शित होणार आहे..'श्री केळमाई भवानी' प्रॉडक्शन निर्मित आणि निलेश कृष्णाजीराव पालांडे ऊर्फ निलेश कृष्णा लिखित, दिग्दर्शित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे निर्माते निलेश पालांडे यांनी आज रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
'शिमगा' हा सण चाकरमान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. हा सण साजरा करायला मुंबई, पुणे तसेच महाराष्ट्रभरातून चाकरमानी कोकणात येतात. शिमग्याला गावकरी ग्रामदेवतेच्या देवळात एकत्र येऊन देवाची पालखी नाचवतात. त्यानंतर ती पालखी गावातील प्रत्येक घराघरात जाते. कोकणात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दरम्यान कोकणात असणारी मजा काही औरच असते. अर्थात या काळात मानापमान, रुसवेफुगवेही असतात, तरीही हा 'शिमगा' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच कथानकावर आधारित 'शिमगा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमामध्ये राजेश शृंगारपूर, भूषण प्रधान, कमलेश सावंत, मानसी पंड्या, सुकन्या सुर्वे, विजय आंदळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी प्रदर्शित झाली आहेत. या सिनेमाचे 90 टक्के चित्रीकरण लांजा तालुक्यात झालं आहे. आसगे,वाकेड, केळंबे या गावांमध्ये हर चित्रीकरण करण्यात आलं असल्याची माहिती निलेश फाळके यांनी दिली..

कोकणात साजऱ्या होणाऱ्या शिमग्याचे या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना दर्शन घडेल. चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. पंकज पडघण यांनी संगीत दिलेल्या गाण्यांना गुरु ठाकूर आणि वलय यांनी शब्दबद्ध केलं असल्याचं पालांडे यांनी यावेळी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details