महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

शिल्पा शेट्टीच्या घरी ७ वर्षानंतर पुन्हा पाळणा हलला, गोड परीचे आगमन - Shilpa Shetty Raj Kundra become parents again

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. अभिनेत्री पुन्हा एकदा छोट्या मुलीची आई झाली आहे.

Shilpa Shetty
शिल्पा शेट्टी

By

Published : Feb 21, 2020, 3:41 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि बिझनेसमन राज कुंद्रा यांच्या घरी छोट्या परीचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. शिल्पा दुसऱ्यांदा आई झाली असून सरोगसीच्या माध्यमातून तिला कन्यारत्न प्राप्त झालंय.

शिल्पा आणि राज यांनी मुलीचे नाव समीशा शेट्टी कुंद्रा असे नाव ठेवले आहे.

शिल्पाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करीत ही आनंद वार्ता चाहत्यांना दिली. समीशाचा जन्म १५ फेब्रुवारीला झाल्याचे आणि आपल्या लाडक्या लेकीचे ''ज्युनियर परी'' शब्दाने हॅशटॅग केले होते.

या बातमीनंतर शिल्पाला सर्वच स्तरातून खूप शुभेच्छा मिळत आहेत. यावेळी ती सरोगसीच्या माध्यमातून आई झाली आहे. शिल्पाला अगोदर एक 7 वर्षांचा मुलगा आहे.

कामाच्या पातळीवर शिल्पा पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये परणार आहे. निकम्मा या चित्रपटात ती काम करीत आहे. १३ वर्षानंतर ती रुपेरी पडद्यावर झळकेल. ५ जूनला हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात परेश रावल, मीजान आणि प्रणीता सुभाष मुख्य भूमिकेत आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details