मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने १९९३ साली 'बाजीगर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत काजोल, शाहरुख खान मुख्य भूमिकेत झळकले होते. या चित्रपटात तिची छोटीच भूमिका होती. मात्र, या चित्रपटाने तिला बॉलिवूडचे रस्ते खुले करुन दिले होते. मात्र, पुढे जास्त काळ ती चित्रपटसृष्टीत दिसली नाही. याबाबत शिल्पाने सोशल मीडियावर खुलासा केला आहे. एक पोस्ट शेअर करून तिने यामागचे कारण सांगितले आहे.
....यामुळे शिल्पा शेट्टीला चित्रपटातून नाकारले जायचे, सोशल मीडियावर व्यक्त केलं दु:ख - bollywood
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने १९९३ साली 'बाजीगर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत काजोल, शाहरुख खान मुख्य भूमिकेत झळकले होते. या चित्रपटात तिची छोटीच भूमिका होती. मात्र, या चित्रपटाने तिला बॉलिवूडचे रस्ते खुले करुन दिले होते.
शिल्पाने इन्स्टाग्रामवर तिच्या आतापर्यंतचा प्रवास उलगडला आहे. तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे, की 'माझा रंग डार्क असल्यामुळे मला नेहमी रंगावरून डिवचले जायचे. ग्रॅज्युएशननंतर माझ्या वडिलांसोबत मी काम केले होते. मला नेहमी काहीतरी वेगळे करायचे होते. त्यावेळी मी एका फॅशन शोमध्ये सहभाग घेतला होता. तेव्हा माझी ओळख एका फोटोग्राफरसोबत झाली होती. त्याने माझे काही फोटो काढले. ते फोटो पाहून मला माझ्यावरच विश्वास बसत नव्हता.
त्यानंतर माझ्यासाठी मॉडेलिंगचे दरवाजे खुले झाले. १७ वर्षाची असताना मी सिनेसृष्टीत एन्ट्री घेतली होती. मला तेव्हा खूप काही शिकायचे होते. पण, मला मिळालेल्या यशासाठी मी तेव्हा तयार नव्हती. मला हिंदी भाषा बोलणं अवघड जात होतं. कॅमेरासमोर जायलादेखील मी घाबरत होती. एक वेळ अशी आली की मला काम मिळणं बंद झालं. मी त्यानंतर खूप प्रयत्न केले. पण, निर्माते मला विनाकारण चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवत होते. मी तरीही माझे प्रयत्न सुरू ठेवले. मी त्यावेळी बिग ब्रदरमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पण तिथेही भेदभाव करण्यात आला. मी एकटी होती. तरीही मी स्वत:ला कमजोर होऊ दिले नाही. तेव्हा मला कळले की, आयुष्यात स्ट्रगल किती महत्वाची असते. माझे आयुष्य अनेक चढउतारांनी भरलेले आहे. त्यामुळेच आज मी मजबुत बनली आहे', असे शिल्पाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.