महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

शिल्पा शेट्टी कुंद्राचे ‘सुपर डान्सर-चॅप्टर ४’ मध्ये शानदार पुनरागमन! - शिल्पा शेट्टी कुंद्राचे पुनरागमन

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील सुपर डान्सर-चॅप्टर ४ या साप्ताहिक शोचे चित्रीकरणसुद्धा महाराष्ट्राच्याबाहेरील दमण येथे शिफ्ट करण्यात आले. या अचानक बदलामुळे शिल्पा शेट्टी कुंद्रा, जी ‘सुपर डान्सर-चॅप्टर ४’ मध्ये जज म्हणून काम बघते, काही अपरिहार्य कारणास्तव लगेचच युनिटसोबत दमणला जाऊ शकली नव्हती. परंतु आता शिल्पा शेट्टी कुंद्राचे ‘सुपर डान्सर-चॅप्टर ४’ मध्ये शानदार पुनरागमन झाले आहे.

Shilpa Shetty Kundra returns
शिल्पा शेट्टी कुंद्राचे पुनरागमन

By

Published : May 25, 2021, 10:58 PM IST

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झाला आणि सर्व प्रकारच्या शुटिंग्सवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे छोट्या पडद्यावरील अनेक मालिका आणि शोज महाराष्ट्राबाहेर शूट होऊ लागले जेणेकरून प्रेक्षकांना नवीन भाग बघायला मिळतील. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील सुपर डान्सर-चॅप्टर ४ या साप्ताहिक शोचे चित्रीकरणसुद्धा महाराष्ट्राच्याबाहेरील दमण येथे शिफ्ट करण्यात आले. या अचानक बदलामुळे शिल्पा शेट्टी कुंद्रा, जी ‘सुपर डान्सर-चॅप्टर ४’ मध्ये जज म्हणून काम बघते, काही अपरिहार्य कारणास्तव लगेचच युनिटसोबत दमणला जाऊ शकली नाही.

शिल्पा शेट्टी कुंद्राचे पुनरागमन

शिल्पाच्या अनुपस्थितीत मलाईका अरोराने ते काम पहिले. तसेच अनुराग बसू सुद्धा बदललेल्या वेळापत्रकांची जुळवाजुळव करण्यासाठी मुंबईतच थांबले होते. त्यांची जागा कोरियोग्राफर टेरेन्स लुईस याने भरून काढली. परंतु आता अनुराग बसू आणि शिल्पा शेट्टी कुंद्राचे ‘सुपर डान्सर-चॅप्टर ४’ मध्ये शानदार पुनरागमन झाले असून पुन्हा एकदा शिल्पा शेट्टी कुंद्रा , गीता कपूर, अनुराग बसू हे जजेजचं ओरोजिनल त्रिकुट या शोमध्ये जज म्हणून दिसणार आहेत. ‘सुपर डान्सर-चॅप्टर ४’ चे लहानगे स्पर्धक आणि त्यांचे सुपरगुरू यांनी एका डान्सद्वारे दाखवून दिले की त्या सर्वांनी शिल्पा ला किती ‘मिस’ केले.

शिल्पा शेट्टी कुंद्राचे पुनरागमन
या आठवड्याच्या शनिवार व रविवार च्या विंकेन्ड एपिसोड्समध्ये अतिथी म्हणून सुनील शेट्टी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. दोन्ही शेट्टी, म्हणजे शिल्पा आणि सुनील, एकमेकांचे घट्ट मित्र आहेत आणि त्यांच्या भूमिका असलेला वीसेक वर्षांपूर्वीचा चित्रपट ‘धडकन’ आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. स्पर्धकांनी ‘शेट्टी’ गाण्यांवर नृत्ये सादर करीत सर्वांकडून वाहवाही मिळविली आणि शिल्पा आणि सुनील शेट्टी यांनी ‘धडकन’ चित्रीकरणाच्या वेळचे धमाल किस्से सांगून सर्वांचे मनोरंजन केले. त्याहीपुढे जात या दोघांनी स्टेजवर येऊन त्यांच्या गाण्यांवर परफॉर्म सुद्धा केले. ‘सुपर डान्सर-चॅप्टर ४’ हा डान्स रियालिटी शो सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होतो.

हेही वाचा - कांताबाई सातारकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतीक क्षेत्राचे मोठे नुकसान - बाळासाहेब थोरात

ABOUT THE AUTHOR

...view details