मुंबई - बॉलीवूडच्या फिट अभिनेत्रींपैकी एक शिल्पा शेट्टी वयाच्या चाळीशीतही वर्कआउट आणि योगा करायला विसरत नाही. शिल्पा वेळोवेळी सोशल मीडियावर तिच्या वर्कआउट आणि फिटनेस प्लॅनबद्दल सांगत असते. आता शिल्पाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती वर्कआऊट केल्यानंतर जिममध्ये खूप थकली आणि शांतपणे जमिनीवर पडली असल्याचे दिसत आहे.
शिल्पाने सोमवार मोटिव्हेशनवर व्हिडिओ शेअर केला आहे आणि यामध्ये ती योगा करताना आणि कधी कठीण वर्कआउट करताना दिसत आहे. शिल्पाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती जिममध्ये झोपलेली दिसत आहे. शिल्पाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. व्हिडिओमध्ये शिल्पा 'मार डाला' असे म्हणताना दिसत आहे.