महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

शिखर धवनला वडीलांनी मारली थोबाडीत, म्हणतो - "बाप हमेशा बाप होता है" - पृथ्वी शॉसोबत शिखर धवन

शिखर धवन त्याच्या सोशल मीडियामधील रिलसाठी ओळखला जातो. अलिकडेच पोस्ट केलेल्या एका व्हिडिओत शिखर त्याच्या वडीलांसोबत गंमत करताना दिसतो. त्यानंतर वडील भडकतात आणि त्याच्या श्रीमुखात ठेवून देतात. या व्हिडिओला शिखरने कॅप्शनही समर्पक दिलंय. त्याने लिहिलंय, ''बाप हमेशा बाप होता है.''

शिखरच्या वडीलांना कानशीलात मारली
शिखरच्या वडीलांना कानशीलात मारली

By

Published : Jan 28, 2022, 7:53 PM IST

मुंबई - भारताचा तडाखेबंद फलंदाज आणि एकदिवसीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन त्याच्या सोशल मीडियामधील रिलसाठी ओळखला जातो. त्याचे इन्स्टापेज तपासले तर लक्षात येईल की त्याने आजवर भरपूर मनोरंजक व्हिडिओज बनवल्याचे पाहायला मिळतात. त्याचे इन्स्टाग्रामवर कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत. सध्या त्याचा एक व्हिडिओ खूप गाजतोय. यात त्याचे वडील त्याच्या थोबाडीत मारताना दिसत आहेत.

या व्हिडिओत शिखर त्याच्या वडीलांसोबत गंमत करताना दिसतो. त्यानंतर वडील भडकतात आणि त्याच्या श्रीमुखात ठेवून देतात. या व्हिडिओला शिखरने कॅप्शनही समर्पक दिलंय. त्याने लिहिलंय, ''बाप हमेशा बाप होता है.'' या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये हरभजन सिंगनेही बेस्ट अशी कमेंट केली आहे.

क्रिकेटच्या मैदानावर षटकार चौकार ठोकणारा शिखर सोशल मीडियावरही दमदार कामगिरी करताना दिसतो. त्याचे व्हिडिओ चाहते आवडीने पाहतात आणि भरभरुन कॉमेंट्सही देत असतात. काही दिवसापूर्वी त्याने टीममधील सहकारी पृथ्वी शॉसोबत काही व्हिडिओ बनवले होते. यातील एका व्हिडिओ शिखर बासरी वाजवताना दिसला होता तर पृथ्वी, ''ये शाम मस्तानी मदहोश किये जाए'' हे गाणे गात होता. यावर अनेक क्रिकेट्रसनी कॉमेंट्स केल्या होत्या.

हेही वाचा -Yrf Spy Universe: हृतिकला सलमानच्या 'टायगर 3' व Srk च्या 'पठाण'मध्ये सामील होण्यास रस नाही?

ABOUT THE AUTHOR

...view details