'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका गेली ३ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. अनेक वळणावरुन ही मालिका यशस्वी पुढे सरकत आहे. या मालिकेतील राणादा, अंजलीबाई, वहिनीसाहेब, चंदा, आजी ही पात्रे लोकप्रिय झाली आहेत. अनेक बदल या मालिकेमध्ये नव्या वर्षात होणार आहेत.
Exclusive : वसगडेच्या वाड्यातून अंजलीबाई-राणादाचं शिफ्टिंग, चित्रीकरणाचं ठिकाण बदललं - Ranada latest news
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचे शूटींग कोल्हापूर जवळील वसगडे गावात सुरू होते. नव्या वर्षाच्या सुरूवातीला नव्या वास्तुत शूटींग करण्याचा निर्णय टीमने घेतला आहे. कोल्हापूरातील केर्ली या गावात आता हे शूट होणार आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातील मालिकेमध्ये त्यांचा वसगडे येथील वाडा सोडण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतलाय. गेली ३ वर्षे कोल्हापूर जवळील वसगडे या गावात शूटिंग सुरू आहे. याच गावातील अनेक लोकेशन्सवर मालिकेचे शूटींग सुरू होते. या गावातील वाड्यात मालिकेचे बहुतांश शूटिंग पार पडले. मात्र नव्या वर्षात नव्या घरात, भव्य वास्तूत शूटिंग सुरू होणार आहे. नव्या लोकेशन्सवर शूटिंगला सुरूवात झाली आहे.
नवीन लोकेशन्स हे कोल्हापूर जिल्ह्यातील केर्ली या गावात असणार आहे. जोतिबा पन्हाळा मार्गावरील केर्ली या गावातील नवीन वास्तूत हे शूटिंग यापुढे होईल. हे नवे लोकेशन कसे आहे याची झलक तुम्हाला आम्ही दाखवित आहेत..