मुंबई - सोशल मीडियावर आपल्या लाडक्या कलाकारांचे थ्रोबॅक व्हिडिओ आणि फोटो पाहायला मिळणे म्हणजे चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणीच असते. त्यामुळेच बरेचसे कलाकार आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आपले काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. विशेष म्हणजे त्यांच्या या फोटो आणि व्हिडिओंना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो. सध्या असाच एक थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. या व्हिडिओमध्ये एक चिमुकली तिच्या गोड आवाजाने सर्वांवर भूरळ पाडताना दिसते. या व्हिडिओतील ही चिमुकली नक्की कोण, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
व्हिडिओत दिसणारी ही चिमुकली दुसरी तिसरी कोणी नसून फरहान अख्तरची गर्लफ्रेन्ड आणि मॉडेल असलेली शिबानी दांडेकर आहे. शिबानीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करताच या व्हिडिओला लाखो व्हिव्ज मिळाले आहेत. तसंच शिबानीच्या आवाजाचं कौतुकही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
'जाने कहा मेरा जिगर' आणि 'सत्ते पे सत्ता' ही दोन गाणी ती या व्हिडिओत गाताना दिसते. विशेष म्हणजे तिच्या वडिलांनी नव्या व्हिडिओ कॅमेरात पहिल्यांदा तिचा हा व्हिडिओ शूट केला होता. फरहान अख्तरनेही शिबानीचं कौतुक करत तिच्या व्हिडिओवर कमेंट केली आहे.