महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

शहनाझला वाटते, 'पक्ष्यांसारखे उडावे', व्हिडिओमुळे चाहते आनंदी - शहनाझचा नवा व्हिडिओ

शहनाज गिलने ( Shehnaaz Gill ) शुक्रवारी एका छान व्हिडिओची तिच्या चाहत्यांना भेट दिली. व्हिडिओमध्ये शहनाज समुद्रकिनाऱ्यावर धावताना दिसत आहे आणि तिच्या धावण्याने कबुतर उडत आहेत. शहनाजला आनंदी मूडमध्ये पाहून तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

शहनाज गिल
शहनाज गिल

By

Published : Feb 12, 2022, 3:35 PM IST

मुंबई (महाराष्ट्र) - अभिनेत्री - गायिका शहनाज गिलने ( Shehnaaz Gill ) शुक्रवारी समुद्रकिनाऱ्यावर कबुतरांचा पाठलाग करतानाचा एक आनंदी व्हिडिओ शेअर केला आहे. या कृतीने तिने आपल्या चाहत्यांना आनंदित केले आहेशहनाजला आनंदी मूडमध्ये पाहून तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

व्हिडिओमध्ये शहनाज समुद्रकिनाऱ्यावर धावताना दिसत आहे आणि तिच्या धावण्याने कबुतर उडत आहेत. धावताना कॅमेऱ्याकडे वळून म्हणते, ''थक गई.'' व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, "मलाही असेच उडता आले असते तर किती बरे झाले असते."

शहनाजला आनंदी मूडमध्ये पाहून तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला. "तू नेहमी अशीच हसत राहा," अशी टिप्पणी एका सोशल मीडिया युजरने केली. "तू उडत आहेस, सुंदरी... तू खूप उंच उडत आहेस. देव तुला आशीर्वाद देईल," असे दुसर्‍याने लिहिले. "बर्‍याच दिवसांनंतर आम्हाला इतका सुंदर कंटेंट मिळाला आहे, शहनाझ स्वत: आनंदी आहे," असे दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले आहे.

गेल्या वर्षी तिचा जवळचा मित्र सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाजने लो प्रोफाइल ठेवली होती. तिने अलीकडेच सार्वजनिक वावरणे सुरू केले आहे. दरम्यान, कंगना रणौत होस्ट केलेल्या लॉक अप रिअॅलिटी शोमध्ये प्रवेश करणार्‍या 16 स्पर्धकांपैकी शहनाझ असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा -Hijab Row: हिजाबच्या वादात सोनम कपूर झाली ट्रोल

ABOUT THE AUTHOR

...view details