शीतल अहिरराव आणि वृषभ शहा यांचे ‘मंगलाष्टक रिटर्न' - शीतल अहिरराव आणि वृषभ शहा
निर्माता वीरकुमार शहा आणि 'शारदा प्रॉडक्शन' या प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती असलेला अभिनेता वृषभ शहा आणि अभिनेत्री शीतल अहिरराव यांचा ‘मंगलाष्टक रिटर्न' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून, वर्ष अखेरीस तो चित्रपटगृहात दिसेल.
मुंबई - सध्या मिनी-लॉकडाऊन मुळे सर्व कामांना खीळ बसली आहे. आणि त्यात मनोरंजनसृष्टीही मोडते. परंतु, कोरोनावर मात करण्याच्या निर्धार करत सर्वच जण त्याला काबूत आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या वर्षीच्या सुरुवातीला आशावादी वातावरण निर्माण झाले होते आणि चित्रपटसृष्टीची सावरत चालली होती. त्याच सुमारास अनेक निर्मात्यांनी नव्या प्रोजेक्ट्सची घोषणा केली. वेगवेगळ्या धाटणीच्या कथा, सादरीकरण यासह आता सिनेमात कलाकारांच्या नव्या फ्रेश जोड्या आणण्याकडेही निर्मात्यांचा कल असतो. लवकरच अभिनेता वृषभ शहा आणि अभिनेत्री शीतल अहिरराव ‘मंगलाष्टक रिटर्न' या चित्रपटातून प्रेक्षकांना भेटीला येत आहेत.