महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आयुष्याची गाडी रुळावर आणण्यासाठी केलेली रोड ट्रिप : ‘शांतीत क्रांती’! - on Sony Live तोूाेू लाैे

सोनी लिव्हने आपल्या आगामी मराठी ओरिजिनल ‘शांतीत क्रांती’ मध्ये मैत्री, प्रवास आणि स्वतःचा शोध यावर आधारित कथानक घेतलं आहे. श्रेयस, प्रसन्न आणि दिनार हे तीन बेस्ट फ्रेंड्स. ‘शांतीत क्रांती’ ही त्यांनी आपल्या आयुष्यातील समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी गोव्याला केलेल्या रोड ट्रिपची गोष्ट आहे.

Shantit Kranti
‘शांतीत क्रांती’!

By

Published : Jul 31, 2021, 3:43 PM IST

सध्या कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांनी घरी राहणेच पसंत केले आहे. भटकंती करून उगाच या महामारीला का निमंत्रण द्या, हा त्यामागचा हेतू. परंतु बाहेर फिरायला जाणे, पिकनिक करणे वा एखाद्या रोड ट्रिप ला जाणे यासारखे सुखद काहीच नाही कारण एक तर प्रवास आपले आयुष्य समृद्ध करीत असतो तसेच मनाची मरगळही निघून जाते. कधी-कधी आयुष्यात काही गोष्टी नीट होण्यासाठी जवळच्या मित्रांसोबत फक्त एका रोड ट्रिपची गरज असते हे अनेकांना अनुभवाने माहित आहे.

सोनी लिव्हने आपल्या आगामी मराठी ओरिजिनल ‘शांतीत क्रांती’ मध्ये मैत्री, प्रवास आणि स्वतःचा शोध यावर आधारित कथानक घेतलं आहे. श्रेयस, प्रसन्न आणि दिनार हे तीन बेस्ट फ्रेंड्स. ‘शांतीत क्रांती’ ही त्यांनी आपल्या आयुष्यातील समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी गोव्याला केलेल्या रोड ट्रिपची गोष्ट आहे. एक साधी रोड ट्रिप त्यांच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणते. ती त्यांना आत्मपरीक्षण करण्यासाठी आणि आयुष्यातील कधीही न अनुभवलेल्या गोष्टी अनुभवण्याची संधी देते. ‘शांतीत क्रांती’ ही शांतता आणि कल्याणाचे प्रतीक असून या शोमध्ये सुंदर पद्धतीने ३ मित्रांची मैत्री दाखवली आहे. ती अत्यंत अर्थपूर्ण आणि धमाल असून प्रेक्षकांशी लगेचच नाते जुळविते.

नात्यातील असुरक्षिततेसारख्या समस्या, आयुष्यातील अशाश्वतता, अपूर्ण स्वप्ने अशा समस्यांचा सामना करण्यापासून हा शो नवीन दृष्टीकोन आणि शिकवण हलक्याफुलक्या पद्धतीने लोकांसमोर आणतो. ‘शांतीत क्रांती’ ही फक्त तीन जवळच्या मित्रांची कथा नाही तर त्यांचा स्वतःचा शोध आणि ओळख यांच्या दिशेने त्यांनी केलेला हा प्रवास आहे. आश्चर्यकारक, हास्याच्या उकळ्या फुटणारे क्षण, रस्त्यावरील अनुभव, दिलखेचक संवाद आणि ताल धरायला लावणारे रॅप संगीत यांच्यामुळे हा शो नक्कीच प्रेक्षकांचे मनोरंजन करेल.

भाडिपा म्हणजेच भारतीय डिजिटल पार्टीचे संस्थापक सारंग साठे आणि पॉला मॅकग्लिन यांचे दिग्दर्शन असलेल्या या शोमध्ये लोकप्रिय मराठी कलाकार अभय महाजन, ललित प्रभाकर आणि आलोक राजवाडे अनुक्रमे श्रेयस, प्रसन्न आणि दिनार च्या प्रमुख भूमिकेत दिसतील. या शोमध्ये लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री शिखा तलसानिया मराठीत प्रथमच दिसणार असून ती प्रमुख भूमिकेत दिसेल.

या शोचे दिग्दर्शक सारंग साठ्ये आणि पॉला मॅकग्लिन म्हणाले की, “शांतीत क्रांती हा फक्त शो नाही तर तो आयुष्याचा एक सुंदर अनुभव आहे. हा शो सोनीलिव्ह, आमची क्रिएटिव्ह टीम आणि आमच्या टॅलेंटेड कलाकारांमधील भागीदारीचा परिपाक आहे. त्यामुळे हा शो शक्य झाला आहे. रोड ट्रिप, कथा, निर्माण झालेल्या आठवणी आणि अनुभव हे सर्व नॉस्टॅल्जिया, हास्याचे क्षण आणि आयुष्याला मिळालेले धडे हे घेऊन येतील. ही कथा नक्कीच आमच्या प्रेक्षकांना आवडेल आणि आम्हाला आशा आहे की, ते नक्कीच या राइडचा आनंद घेऊ शकतील.”

उत्तम, विचारप्रवर्तक कन्टेंटसोबत प्रादेशिक घटकांवर भर देत सोनी लिव्हने आपल्या आगामी मराठी ओरिजिनल ‘शांतीत क्रांती’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित केला आहे.

हेही वाचा - नादखुळा म्युझिकचे पहिले गाणे ‘आपली यारी', १२ तास, १० लाख व्ह्यूज!

ABOUT THE AUTHOR

...view details