मुंबई- बिग बॉस 15 मधील तिच्या प्रतिष्ठित खेळाने प्रेम आणि कौतुक मिळवण्यात यशस्वी ठरलेली बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यावर्षीचा वाढदिवस अधिक खास आहे कारण ती सिंगल राहिलेली नाही. तिचा प्रियकर राकेश बापटसोबत तिने आपला खास दिवस साजरा केला.
शमिता शेट्टीवर तिच्या वाढदिवशी प्रेमाचा वर्षाव करत राकेश बापटने सोशल मीडियावर फोटोंची एक स्ट्रिंग शेअर केली आहे. या फोटोमध्ये दोघांना एकमेकांचा हात सोडणे कठीण जात असल्याचे दिसत आहे.
तिच्या मिडनाईट बर्थडे पार्टीच्या प्रसंगी शमिताने मेटॅलिक गाऊन परिधान केलेली दिसत आहे. राकेश बापटही वाढदिवसाच्या प्रसंगी आनंदी आणि उत्साही दिसत आहे.
शमिताची बहीण आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही सोशल मीडियावर प्रेमाने भरलेला संदेश लिहिला. तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शिल्पाने शमितासोबत स्वतःचे आणि कुटुंबीयांचे फोटो असलेला एक सुंदर मोन्टाज व्हिडिओ शेअर केला आहे.
कॅप्शनमध्ये तिने लिहिले, "मला तुला नेहमी असेच पहायचे आहे... आनंदी! तुला खूप खूप शुभेच्छा, माझी टुंकी... माझ्या वाघिणी. या वाढदिवसाला अनेक आनंदी आश्चर्ये उलगडतील आणि तुझी सर्व अविश्वसनीय स्वप्ने पूर्ण होवोत. तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझा खूप अभिमान आहे! हे वर्ष खूप चांगले जावो, माझी जान, आणि तुला सदैव भरपूर आशीर्वाद मिळो."
बिग बॉस 15 च्या सर्वात मजबूत स्पर्धकांपैकी एक असलेल्या शमिताने रिअॅलिटी शोच्या टॉप 5 मध्ये स्थान मिळवले आणि चौथे स्थान पटकावले होते.
हेही वाचा -सलमान खान आता सिंगल नाही, त्याच्या रिलेशनशिप स्टेटसवर खुलासा