मुंबई - दिग्दर्शक करण जोहर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावरही तो बऱ्यापैकी सक्रिय असतो. मात्र, एका कारणामुळे करण जोहर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. ट्विटरवर सध्या '#ShameOnKaranJohar' हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे.
करण जोहरवर भडकले नेटकरी, ट्विटरवर ट्रेण्ड होतोय '#ShameOnKaranJohar' - #ShameOnKaranJohar
ट्विटरवर सध्या '#ShameOnKaranJohar' हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे.
हा हॅशटॅग ट्रेण्ड होण्यामागचं कारण म्हणजे करण जोहरने शाहरुख खानविरोधात केलेले एक ट्विट लाईक केले होते. एका चाहत्याने हे ट्विट केले होते. शाहरुख आणि अक्षय कुमारची तुलना होऊच शकत नाही, असे या ट्विटमध्ये लिहिले होते. हे ट्विट करण जोहरने लाईक केल्यानंतर शाहरुखच्या चाहत्यांनी करणला धारेवर धरले. या हॅशटॅगवर २२ हजारांपेक्षा जास्त ट्विट आले आहेत.
करण जोहर आणि शाहरुख खान एकमेकांचे चांगले मित्र असूनही त्याने हे ट्विट कसे काय लाईक केले, असा सवाल शाहरुखचे चाहते विचारत आहेत. याबाबत करण जोहरने ट्विटवर स्पष्टिकरण दिले आहे. काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्याकडुन चुकून हे ट्विट लाईक झाले, असे त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे. माझ्याबाबत कोणताही गैरसमज करून घेऊ नका, असेही त्याने चाहत्यांना म्हटले आहे. पुढे त्याने आणखी एक ट्विट करून म्हटले आहे, की 'आज ट्विटरमध्ये काहीतरी गडबड झाली आहे, बाकी सर्व 'फर्स्ट क्लास' आहे'.
आता करण जोहरच्या या स्पष्टिकरणावर शाहरुख खान काय उत्तर देतो, याची चाहत्यांना आतुरता आहे.