मुंबई - किंग खान शाहरुखचा बॉलिवूड प्रवास सर्वांनाच माहित आहे. एक सामान्य व्यक्ती ते सुपरस्टार, हा प्रवास शाहरुखसाठी नक्कीच सोपा नव्हता. अनेक कठीण परिस्थितीचा सामना करून त्याने आज लाखो करोडो चाहत्यांच्या मनात स्थान मिळवले आहे. मात्र, त्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या दोन व्यक्तींनी त्याला मदत केली त्यासाठी त्याने आभार व्यक्त केले आहेत.
....म्हणून किंग खान म्हणतोय, 'या' दोन व्यक्तीमुंळे माझे स्वप्न पूर्ण झाले - aditya chopra
अनेक कठीण परिस्थितीचा सामना करून शाहरुखने आज लाखो करोडो चाहत्यांच्या मनात स्थान मिळवले आहे. मात्र, त्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या दोन व्यक्तींनी त्याला मदत केली त्यासाठी त्याने आभार व्यक्त केले आहेत.
शाहरुख खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर करण जोहर आणि आदित्य चोप्रा यांचे आभार व्यक्त करत एक ट्विट केले आहे. करण जोहर आणि शाहरुख खान एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. त्याच्या स्ट्रगलिंग काळामध्ये करण जोहर आणि आदित्य चोप्रा यांनीच त्याला आधार दिला. त्यामुळे शाहरुखने दोघांचाही फोटो कोलाज करून लिहिले आहे, की 'स्वप्न पाहणे ही चांगली गोष्ट आहे. मात्र, जर त्या स्वप्नांना योग्य दिशा योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, तर ती भरकटू शकतात. या दोन व्यक्तींनी माझ्या स्वप्नांना पंख दिले. माझ्या प्रत्येक स्वप्नपूर्तीमागे करण आणि आदित्य हे दोघे होते. त्यामुळे स्वप्नांपेक्षा ज्या व्यक्ती तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करतात त्या व्यक्ती जास्त महत्वाच्या असतात'.
शाहरुख खानने करण जोहरच्या 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम' आणि 'माय नेम इज खान' यांसारख्या चित्रपटात काम केले आहेत. तर, आदित्य चोप्रासोबत 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'जब तक है जान', 'वीर-जारा' आणि 'रब ने बनादी जोडी' या चित्रपटात काम केले आहे.