मुंबई - किंग खान शाहरुखच्या बेताल या आगामी नेटफ्लिक्स मालिकेचे शूटींग संपले आहे. अभिनेत्री अहना कुमरा हिने शाहरुखसोबतचा फोटो शेअर करीत बेतालचे शूटींग संपल्याचे लिहिले आहे. अहनासाठी हा सुंदर प्रवास होता. खूप काही शिकायला मिळाले, असेही तिने लिहलंय.
बेताल : शाहरुखच्या हॉरर मालिकेचे शूटींग संपले - Netflics
शाहरुखच्या बेताल या आगामी नेटफ्लिक्स मालिकेचे शूटींग संपले आहे. अभिनेत्री अहना कुमरा हिने शाहरुखसोबतचा फोटो शेअर करीत ही माहिती दिली आहे. ही एक हॉरर मालिका आहे.
शाहरुख आणि अहना कुमरा
बेताल या मालिकेचा शाहरुख खान सह निर्माता आहे. ही एक हॉरर वेब सिरीज आहे. याचे लिखाण आणि दिग्दर्शन पॅट्रिक ग्राहम यांनी केलंय तर निखील महाजन यांनी सहदिग्दर्शन केलंय. रेड चिलीज एन्टरटेन्मेंट, वर्मा आणि नेटफ्लिक्सने याची निर्मिती केलीय.