मुंबई -बिग बॉस -13 विजेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या जाण्याने मनोरंजनविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. थोडे अस्वस्थ वाटल्याने त्याने काही औषधे घेतली आणि नंतर रात्री तो उठलाच नाही. जाणून घेऊया आदल्या रात्री काय घडले ते....
- सिद्धार्थ बुधवारी संध्याकाळी आई रीटासोबत फिरायला गेला होता.
- बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थने काही औषधे घेतली होती.
- त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने आईकडे पाणी मागितले. यानंतर सिद्धार्थ झोपायला गेला.
- आईने सकाळी उठण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो उठलाच नाही.
- त्यानंतर त्याच्या आईने मुलगी प्रीतीला बोलावले आणि सिद्धार्थला कूपर हॉस्पिटलमध्ये नेले. येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
खून की आत्महत्या ? चर्चांना पूर्णविराम
बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल. पण त्याचे अकाली निधन म्हणजे आत्महत्या आहे का, किंवा कोणी त्याचा खून केला का अशी चर्चा आता रंगली आहे. पण या चर्चांचे स्पष्टीकरण देताना, आपल्याला कोणावरही संशय नसल्याचं सिद्धार्थच्या कुटुंबियांनी सांगितले आहे.