‘वाचाल तर वाचाल’ हे आधीच्या पिढ्यांना पक्के माहित आहे. आधुनिक पिढी दृक्श्राव्य माध्यमांना पसंती देत असल्यामुळे पुस्तकं वाचण्याची प्रथा लयास चालली आहे. परंतु पुस्तकं लोकांच्या ड्रॉइंग-रूमचा आवश्यक भाग असण्यापासून प्रवासातील सर्वोत्तम सोबती असण्यापर्यंतचं काम करीत असतात. पुस्तक वाचण्याच्या आनंदाला कोणतीच सीमा नाही. वाचन हे प्रत्येक कलाकाराच्या जीवनाचा अविभाज्य भाग असला पाहिजे. आधुनिक काळात फारच थोडे कलाकार वाचनाची आवड जोपासताना दिसतात. मात्र जेष्ठ कलाकार रोहिताश्व गौड व हिमानी शिवपुरी यांच्यासाठी पुस्तकं त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत.
पुस्तकं वाचण्याच्या महत्त्वाबाबत सांगताना एण्ड टीव्हीवरील मालिका 'हप्पू की उलटन पलटन' मधील कटोरी अम्माची भूमिका करणाऱ्या हिमानी शिवपुरी आणि 'भाबीजी घर पर है' मधील मनमोहन तिवारी म्हणजेच रोहिताश्व गौड यंदाच्या जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुस्तकांप्रती असलेल्या त्यांच्या आवडीबाबत भरभरून बोलताना दिसतात. त्यांच्या मते, पुस्तकं त्यांच्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग आहेत आणि ते वास्तविकतेमध्ये जादूची भर घातलात. हिमानी शिवपुरी ऊर्फ कटोरी अम्मा म्हणाल्या, ''पुस्तकं ही माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. मी अगदी लहान वयातच वाचनाला सुरूवात केली आणि त्यानंतर मी माझे आवडते लेखक व शैलींची लहान लायब्ररी बनवण्यास सुरूवात केली. पुस्तक वाचन ही कोणीही अंगिकारू शकणारी सर्वोत्तम आवड आहे. माझ्या बालपणापासूनच मी ‘किताबी किडा’ होते. मी माझ्या आवडत्या लेखकांची पुस्तके वाचण्यामध्ये इतकी गुंतून जायची की माझ्या अभ्यासाच्या पुस्तकांकडे लक्षच द्यायची नाही. अर्थातच, यामुळे मला परीक्षेच्या वेळी खूपच मेहनत घ्यावी लागायची, पण मला तर वाचनाची आवडच जडली होती.''
त्या पुढे म्हणाल्या, ''मला सर्वाधिक आवडलेली पुस्तके म्हणजे 'गॅब्रियल गार्सिया मार्कीझ यांचे ‘वन हंड्रेड इअर्स ऑफ सॉलिट्यूड', पोलो कोएल्हो यांचे ‘दि आल्केमिस्ट', 'ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगी', खालीद हुसैनी यांचे ‘दि काइट रनर', अमिष यांचे ‘दि शिवा ट्रायलॉजी' आणि झुम्पा लहिरी व अरूंधती रॉय यांची अनेक पुस्तके. यंदाच्या जागतिक पुस्तक दिनानिमित्त मी आवाहन करते की, तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये वाचनाचा समावेश करा. वाचनामुळे संवाद कौशल्यामध्ये सुधारणा होते, तसेच पुस्तक जीवनाकडे नवीन दृष्टिकोनासह पाहायला शिकवतात.''