मुंबई -डिजिटल विश्वात लोकप्रिय असलेल्या 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजची प्रेक्षकांना बऱ्याच दिवसापासून प्रतिक्षा आहे. या वेबसीरिजच्या पहिल्या भागात बरेच ट्विस्ट आणि वळणं पाहायला मिळाली. यातील व्यक्तीरेखादेखील प्रेक्षकांमध्ये फारच लोकप्रिय ठरल्या आहेत. त्यामुळेच सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या भागाचीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच आता या सीरिजचा दुसरा टीजर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे.
'सेक्रेड गेम्स-२' प्रदर्शनासाठी सज्ज, दुसरा टीजर प्रदर्शित - saif ali khan
पहिल्या पर्वामध्ये गणेश गायतोंडे, सरदारजी, बंटी, त्रिवेदी या सर्व पात्रांनी प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले. शेवटी त्रिवेदी सोडून कोणीही वाचणार नाही, असे पहिल्या भागात दाखवण्यात आले होते. मात्र, आता दुसऱ्या पर्वात त्रिवेदी सुद्धा वाचणार नाही, हे या टीजरमधुन दाखवण्यात आले आहे. त्या
पहिल्या पर्वामध्ये गणेश गायतोंडे, सरदारजी, बंटी, त्रिवेदी या सर्व पात्रांनी प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले. शेवटी त्रिवेदी सोडून कोणीही वाचणार नाही, असे पहिल्या भागात दाखवण्यात आले होते. मात्र, आता दुसऱ्या पर्वात त्रिवेदी सुद्धा वाचणार नाही, हे या टीजरमधुन दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या दुसऱ्या पर्वात भरपूर अनपेक्षीत गोष्टी पाहायला मिळतील, असा अंदाज लावला जात आहे.
नेटफ्लिक्सच्या अकाऊंटवर 'सेक्रेड गेम्स २'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. १५ ऑगस्टला ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.