'देवमाणूस' या मालिकेने ('Devmanus' TV series)ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेच्या शेवटी डॉक्टर अजित कुमार देवचा मृत्यू न दाखवल्यामुळे या मालिकेचा पुढील भाग येणार याची कल्पना प्रेक्षकांना होती. वज्र प्रोडक्शन्स निर्मित 'देवमाणूस' ह्या झी मराठी वरील एका वेगळ्या धाटणीच्या मालिकेने आपल्या लोकप्रियतेने छोट्या पडद्यावरील टिआरपीचे अनेक रेकॉर्ड तोडले. त्यामुळेच आता 'देवमाणूस’ पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, दुसरा भाग घेऊन. देवमाणूस २ ची प्रेक्षकांना उत्सुकता (Curiosity of the audience of 'Devmanus' 2) होतीच त्यामुळे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टिझर ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. आता 'देवमाणूस २' (Devmanus' 2)या दुसऱ्या सीजनमध्ये नक्की काय दाखवण्यात येणार आहे याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
झी मराठीवरील 'देवमाणूस' (Zee Marathi series 'Devmanus') या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं. या मालिकेतील रंजक वळणं पाहताना प्रेक्षक टीव्हीसमोरून हलत नसत. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक झालं. त्याच्या अभिनयाने त्याने तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि 'देवमाणूस'मधील भूमिकेने त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. सगळ्यांचा लाडका 'देवमाणूस' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.