महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

विश्वसुंदरी पेक्षा वृक्षसुंदरी महत्वाची; अभिनेता सयाजी शिंदे यांचे मत - पर्यावरणाची स्थिती लक्षात घेता विश्वसुंदरी पेक्षा वृक्षसुंदरी महत्वाची

बीड तालुक्यातील पालवण येथील वनराई डोंगरावर देशातील पहिले वृक्ष संमेलन होत आहे. याची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचेही संयोजक सयाजी शिंदे यांनी यावेळी सांगितले.

vruksh-sammelan-in-beed
पत्रकार परिषदेत सयाजी शिंदे बोलत होते

By

Published : Feb 10, 2020, 11:53 PM IST

बीड - जिल्ह्यात होत असलेल्या वृक्ष संमेलनात 'वृक्ष सुंदरी' हा किताब बहाल करण्यात येणार आहे. 'वृक्ष सुंदरी' ही नवी संकल्पना आहे. बीड जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयातील काही मुलींची निवड करून त्यांना वृक्ष लागवड करण्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामधूनच वृक्ष सुंदरी निवडण्यात येईल. खरं म्हणजे पर्यावरणाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता विश्वसुंदरी पेक्षा वृक्ष सुंदरीची जास्त गरज आहे. असे मत अभिनेता सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची उपस्थिती होती.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत सयाजी शिंदे बोलत होते. 13 व 14 फेब्रुवारी रोजी बीड तालुक्यातील पालवण येथील वनराई डोंगरावर देशातील पहिले वृक्ष संमेलन होत आहे. याची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचेही संयोजक सयाजी शिंदे यांनी यावेळी सांगितले.

पत्रकार परिषदेत सयाजी शिंदे बोलत होते

सोमवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत वृक्ष संमेलना संदर्भात उपस्थित पत्रकारांना माहिती देण्यात आली. पुढे बोलताना सयाजी शिंदे म्हणाले की, हे वृक्ष संमेलन सेलिब्रेशन नसून एक धाडस आहे. पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. नव्या पिढीला या सगळ्या परिस्थितीची जाणीव व्हावी, आज-काल केवळ पैसा कमावणे, हाय- फाय गाडी घेणे , घर बांधणे या बाबींना अधिक महत्त्व दिले जात आहे. मात्र ऑक्सिजन देणारे झाड किती महत्त्वाचे आहे, हे कोणी सांगत नाही हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही या वृक्ष संमेलनातून करणार आहोत असे शिंदे म्हणाले.

आयोजित वृक्ष संमेलनासाठी वेगवेगळ्या वृक्षांचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे कोणत्या प्रकारचे झाड लावावे, वृक्ष रोपण केलेल्या झाडाची काळजी कशी घ्यावी. याबाबत प्रात्यक्षिक करून प्रशिक्षणदेखील देण्यात येणार आहे. या अनोख्या प्रक्ष संमेलनांमध्ये बीड जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच पर्यावरण प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार व वृक्ष संमेलनाचे संयोजक सयाजी शिंदे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details