महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सचिनची मुलगी सारा तेंडूलकर जगतेय असे आयुष्य - Sara Tendulkar news

सचिन तेंडूलकरची मुलगी सारा तेंडूलकर ग्लॅमरच्या जगापासून कोसो मैल दूर असते. अतिशय साधी राहणीमान ती अवलंबत असते. सध्या तिचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.

sara-tendulkar simple-life
सारा तेंडूलकर

By

Published : Mar 30, 2020, 8:04 PM IST

मुंबई - क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरची मुलगी सारा तेंडूलकर ग्लॅमरच्या जगापासून कोसो मैल दूर असते. अतिशय साधी राहणीमान ती अवलंबत असते. ती सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही. परंतु तिचे फोटो जेव्हा सोशल मीडियावर येतात तेव्हा सर्वांचेच लक्ष तिच्याकडे जात असते. सध्या तिचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.

सध्या साराने आपले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, ''सामाजिक दूरीने मला २०१९ च्या स्क्रॉलिंगपर्यंत पोहोचवले.'' सारा सध्या फोटोच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात आली आहे.

सारा ही अंजली आणि सचिन तेंडूलकरची मुलगी आहे. तिचा जन्म १९९७ मध्ये झाला होता. तिने आपले शिक्षण मुंबईत 'धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूल'मधून केले आहे. सचिनला अर्जुन हा मुलगा आहे. तो सध्या क्रिकेटचे धडे गिरवत असून त्याच्याकडून खूप अपेक्षा चाहते बाळगून आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details