मुंबई- अभिनेत्री सारा अली खान आगामी 'कुली नंबर 1' या चित्रपटात वरुण धवनसोबत झळकणार आहे. या चित्रपटाच्या गाण्यांमधून दोघांची उत्तम ऑन स्क्रिन केमेस्ट्री जमली असल्याचे दिसून येते. साराने आपल्या इननस्टाग्रामवर पाच सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना चाहत्यांनी भरपूर पसंत केल्याचे दिसत आहे.
सारा अलीने आपल्या इन्स्टाग्रामवर कुली नं.1 मधील पाच फोटोंचा अल्बम शेअर केलाय. यात ती पांढऱ्या वेडिंग गाऊनमध्ये दिसत असून हिऱ्यांच्या दागिन्यांसह सजलेली आहे. यातील दोन फोटोत ती वरुण धवनसोबत आहे. यातील एका फोटोत तिने वरुणचे चुंबन घेतल्याचे दिसत आहे.