महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

साराच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा हा आहे जवळचा व्यक्ती, शेअर केला फोटो - aajkal

सारा काही दिवसांपासून लव्ह आज कल या चित्रपटाच्या सिक्वेलमुळे चर्चेत आहे. अशातच तिने एक फोटो शेअर करुन तिच्या हास्यामागे नेमका कोणता व्यक्ती असतो, हे सांगितले आहे.

साराच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा हा आहे जवळचा व्यक्ती, शेअर केला फोटो

By

Published : Jul 8, 2019, 9:46 PM IST

मुंबई - अल्पावधीच आपल्या अभिनय आणि सौदर्यांने प्रेक्षकांच्या मनात घर केलेली साार अली खान सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिच्या चाहत्यांच्या संख्येतही बरीच भर पडली आहे. तिच्या आयुष्याविषयी जाणून घेण्याचीही चाहत्यांची इच्छा असते. काही दिवसांपासून ती लव्ह आज कल या चित्रपटाच्या सिक्वेलमुळे चर्चेत आहे. अशातच तिने एक फोटो शेअर करुन तिच्या हास्यामागे नेमका कोणता व्यक्ती असतो, हे सांगितले आहे.

तर, साराच्या आयुष्यातील हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसुन तिचा भाऊ इब्राहिम आहे. त्या दोघांमध्ये बहीण भावापेक्षा मेत्रीचे नाते आहे. त्यामुळेच त्यांची बॉन्डिंग एकदम घट्ट असल्याचे पाहायला मिळते. साराने इब्राहिमसोबतचाच एक फोटो शेअर केला आहे. त्यांच्या या फोटोला लाखो चाहत्यांनी लाईक केले आहे.

अलिकडेच साराने कार्तिक आर्यनसोबत लव्ह आज कल चित्रपटाच्या सिक्वेलचे शूटिंग पूर्ण केले आहे. शूटिंग संपल्यानंतर सारा फारच भावुक झालेली पाहायला मिळाली. तिने चित्रपटाच्या टीमसाठी एक पोस्टही लिहिली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details