मुंबई - जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. बालकोट मध्ये केलेल्या एरियल स्राईकने अभिमान दाटून आला. तर विंग कमांडर अभिनंदन यांच्या पाकच्या ताब्यात जाण्यामुळे संपूर्ण देश चिंताग्रस्त झाला. कुणी मागवून या एरियल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले तर कुणाच्या मनात देशभक्तीची भावना जागृत झाली. मात्र या सगळ्याबाबत अनेकांच्या मनात मिश्र भावना निर्माण झाल्या. त्याच आपल्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने केलाय.
संकर्षण कऱ्हाडेची पुलवामा हल्ल्यानंतरची ही कविता ऐकली का ?
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभर देशप्रेमाची लहर तयार झाली...या पार्श्वभूमीवर अनेक कलाकार आपल्या प्रतिक्रिया देताहेत...अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने लिहिलेली कविता आता व्हायरल होतेय...
आपल्या अभिनयाने आणि प्रभावी निवेदनाद्वारे संकर्षणने मराठी सिने-नाटयसृष्टीत आपलं अस एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कोणत्याही विषयावर सडेतोड मत मांडायला आणि प्रसंगी आपल्या प्रेक्षकांना आरसा दाखवायला तो मागे पुढे पहात नाही. त्याच वाचन आणि लेखन किती चांगलं आहे याचा प्रत्यय आपल्याला त्याच्या कविता ऐकल्यावर येतो. पुलवामा हल्ल्यानंतरच्या परिस्थितीवर संकर्षणने केलेली कविता प्रत्येक भारतीयांच्या भावना व्यक्त करणारी आहे. आज त्याने त्याच्या सोशल मिडियावर ती शेअर करताच अनेकांनी त्यावर आपल्या पसंतीची मोहोर उमटवली आहे. काय सांगितलंय त्याने या कवितेतून ते जरा तुम्हीच ऐका.