मुंबई - अभिनेता संजय मिश्रा अलिकडेच वाराणसीमध्ये एका आश्रमात थांबला होता. 'बहुत हुआ सन्मान' या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी तपश्वी जीवनशैली अनुभवण्यासाठी त्याला ही संधी मिळाली. या चित्रपटात राघव जुयाल, अभिषेक चौहान, राम कपूर, निधि सिंह आणि नमित दास यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
संजय मिश्रा म्हणाला, "वाराणसीचे शब्दात वर्णन करणे जवळपास अशक्य आहे. ही एक अशी भावना आहे जी आपल्याला जोडून ठेवते. मी जेव्हाही या शहराचा दौरा करतो तेव्हा मागे काही तरी राहून गेले असे वाटत राहते.''
तो म्हणाला, "'बहुत हुआ सन्मान' चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी मी कलाकार आणि क्रू मेंबर्ससोबत या पवित्र शहराला भेट दिली. ते दिवस खरोखर संस्मरणीय आहेत. राघव, अभिषेक आणि मी शहराचा खऱ्या अर्थाने आनंद घेण्यासाठी सुमारे एक महिना आश्रमात राहिलो. हा एक आनंददायक अनुभव होता. "