मुंबई -संजय दत्त आणि पूजा भट्ट यांच्या गाजलेल्या 'सडक' चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर यांची जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर, संजय दत्तचीही महत्वपूर्ण भूमिका यामध्ये राहणार आहे. मात्र, 'सडक २' चित्रपटाला होकार देण्यासाठी एक खास कारण असल्याचं संजय दत्तने सांगितलं आहे.
संजय दत्त आणि महेश भट्ट हे १९८६ साली 'नाम' चित्रपटासाठी एकत्र आले होते. हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता. महेश भट्ट यांच्याबद्दल बोलताना त्याने सांगितलं, की 'महेश भट्ट हे महान दिग्दर्शक आहेत. ते त्यांचे काम अतिशय चपखलपणे पूर्ण करतात. 'सडक' चित्रपटादरम्यान त्यांच्या या परफेक्शनचा अंदाज आला होता. चित्रपटाच्या सेटवरही ते एखाद्या तरुणाप्रमाणे काम करत असतात.
हेही वाचा -कंगनाने चक्क दरोडेखोरांचा केलाय सामना, स्वत:च केला खुलासा