महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सना खानने उघडपणे केला 'ब्रेकअप'चा खुलासा, म्हणाली... - Melvin Luice latest news

सना खानने कोरिओग्राफर मेल्विन लुईस याच्यासोबत ब्रेकअप झाल्याचे उघडपणे सांगतले. त्याने जे म्हटलंय ते सर्व सत्य असल्याचे सांगताना ती म्हणाली की पुन्हा कोणी सना खान होऊ नये यासाठी हा खुलासा करत आहे. प्रियकराने फसवल्याचे तिने सांगितले.

Sana Khan
सना खान

By

Published : Feb 26, 2020, 6:47 PM IST

मुंबई - अभिनेत्री सना खानने आपला एक्स बॉयफ्रेंड मेल्विन लुईससोबत ब्रेकअप झाल्याचे आपल्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना सोशल मीडियावरुन सांगितले आहे.

यानंतर मेल्विन याच्याकडूनही प्रतिक्रिया पाहायला मिळाली. काही काळासाठी दोघांच्यात सोशल मीडियावर जुंपल्याचेही पाहायला मिळाले. सनाने मेल्विनवर फसवणूक केल्याचा आरोप केला होता. सलग दोन महिने तिला फसवत मेल्विन दुसऱ्या मुलींच्या संपर्कात होता, असेही ती म्हणाली.

आगामी वेब सिरीज 'स्पेशल ऑप्स'च्या फर्स्ट लूक लॉन्चसाठी सना पोहोचली होती. यावेळी मीडियाशी बोलताना तिने, 'पुन्हा कोणी दुसरी सना होऊ नये,' असे म्हटले.

अभिनेत्री सना खान

मेल्विनसंबंधी ती बोलली त्यात किती तथ्य आहे आणि यानंतर त्याची काय प्रतिक्रिया होती असा प्रश्न सनाला विचारण्यात आला. याला उत्तर देताना ती म्हणाली, ''जे काही बोलले ते सत्य होते. जे असते ते दिसत नाही आणि जे दिसत नाही ते असते, हे लोकांसमोर यायला पाहिजे असे मला वाटते.''

ती पुढे म्हणाली, ''मी मुर्ख बनले, कोणी दुसरे मुर्ख बनावे अे मला वाटत नाही. मी यातून बाहेर आले तेव्हा माझ्या लक्षात आले की अशा अनेक माझ्यासारख्या मुली अडकल्या आहेत. जेव्हा लोकांनी मेसेज केला तेव्हा माझ्या लक्षात आले की, मुद्दा छोटा असण्याचा नाही तर तर सत्य बाहेर आणण्याचा आहे. माझ्यासारखी दुसरी कोणी सना बनू नये असे मला वाटते.''

सनाची आगामी मालिका 'स्पेशल ऑप्स' थ्रिलर जॉनरची आहे. ही वेब मालिका भारत, तुर्की, जॉर्डन, अझरबैजान अशा ठिकाणी चित्रित झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details