मुंबई- महाराष्ट्राच्या संरक्षणाची जबाबदारी मुंबई पोलीस तसेच महाराष्ट्र पोलीस अतिशय चोख पद्धतीने नेहमीच बजावत असतात. म्हणूनच त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी व त्यांचे शौर्य संपूर्ण महाराष्ट्र, तसेच जगभरात समोर आणण्यासाठी स्टार प्रवाह नवीन मालिका घेऊन येत आहे. या मालिकेचे नाव आहे 'नवे लक्ष्य'. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ७ मार्चपासून.
या मालिकेच्या प्रमोशनसाठी टीमने अतिशय सुबक असे वाळू शिल्प काढून महाराष्ट्र पोलीस तसेच मुंबई पोलिसांना एक अनोखा सलाम दिला आहे.