महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सलमानच्या घराखाली जाऊन गाणे म्हणायची शिवानी सुर्वे.. - Shivani Surve

बिग बॉस मराठीमधील स्पर्धकांना सलमान खानने सरप्राईज भेट दिली. यावेळी अनेकांनी त्याच्यासोबत मजामस्ती केली. यावेळी शिवानी सुर्वेने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

शिवानी सुर्वे, सलमान खान

By

Published : Aug 17, 2019, 5:18 PM IST


बिग बॉस मराठीच्या दूसऱ्या पर्वात विकेन्डला सर्वांना एक छान सरप्राइज मिळालं. ते म्हणजे या विकेन्डला बॉलिवुड सुपरस्टार सलमान खानची चक्क शोमध्ये एन्ट्री झाली. लहानपणापासून सलमान खानची चाहती असलेल्या शिवानी सुर्वेसाठी तर सलमान खानला याची देही याची डोळा पाहणं आणि त्याच्यासोबत बातचीत करायला मिळणं हा सुखद आश्चर्याचा धक्का होता.

महेश मांजरेकरांनी शिवानीचा परिचय करून देताना, ‘अँग्री यंग वुमन’ असा करून दिला. म्हणूनच सलमान खानला शोमध्ये आलेलं पाहून शिवानीने महेश मांजरेकर यांना प्रश्नही विचारला की, “सर, हे स्वप्न आहे, की सत्य हेच मला समजत नाही.”

सलमाननेही आपल्या चाहतीची थट्टा-मस्करी करायला सुरुवात केली. सलमान म्हणाला, “हो मी सलमानचा डुप्लिकेट आहे. खरं तर, मी तुला माझ्या एका फिल्ममध्ये घेणार होतो. पण तू बिगबॉसच्या घरात आहेस. तुला जर फिल्म करायची असेल, तर एक पर्याय आहे. तिथे कुणाला तरी थप्पड मारून निघून ये.. नियमांचं उल्लंघन करून टाक!”

शिवानीने यावेळी काही आठवणी सांगितल्या, 'पूर्वी सलमान खानच्या घराखाली जाऊन मी अनेकदा ‘जानम समझा करो’ चित्रपटातलं ‘जिद ना करो जरा समझा करो’ हे गाणं नेहमी गायचे.'

यावेळी शिवानीने सलमानसमोर त्याच्याच मुझसे शादी करोगे या सिनेमातलं ‘जिने के है चार दिन’ गाण्यावर डान्स करून सलमानची वाहवाही घेतली.

ABOUT THE AUTHOR

...view details