बिग बॉसच्या १३ व्या पर्वाला सुरूवात होण्यास आता काही दिवस उरले आहेत. अलिकडेच या पर्वात एका नव्या चेहऱ्याची एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे. चंकी पांडेनंतर आता बॉलिवूड गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणदेखील बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे.
बिग बॉच्या वतीने याची अधिकृत घोषणा झाली नसली तरी शोच्या निर्मात्याकडून आदित्य नारायणशी चर्चा सुरू आहे. यावेळी मुग्धा गोडसे आणि माहिका शर्मा यांचीही बिग बॉसमध्ये एन्ट्री होणार आहे.