महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'बिग बॉस'मध्ये ढोल ताशाच्या गजरात सलमान खानचे झाले असे शानदार स्वागत - Big Boss 13 latest news

बिग बॉसच्या १३ व्या पर्वात उपस्थित राहण्यासाठी आलेल्या सलमान खानचे स्वागत एकदम हटके पध्दतीने करण्यात आले. स्वागतचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

'बिग बॉस'मध्ये सलमान खान

By

Published : Sep 23, 2019, 7:01 PM IST

मुंबई - बिग बॉसच्या १३ व्या पर्वाची सुरूवात होत आहे. यासाठी आज एक प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. याला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या सलमान खानचे स्वागत एकदम हटके पध्दतीने करण्यात आले. स्वागतचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

कलर्स वाहिनीने सलमानच्या स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. याचे जबरदस्त समर्थन चाहते करत आहेत. यात तो स्टेजवर धमाकेदार एन्ट्री करताना दिसत आहे. सलमान येताच ढोल ताशांनी परिसर दणाणून गेल्याचे दिसत आहे. सलमानही या तालावर थिरकताना दिसत आहे.

बिग बॉसच्या १३ व्या पर्वाच्या स्पर्धकांचा खुलासा लवकरच होईल. बिग बॉसचा १३ वा सिझन २९ सप्टेंबरला सुरू होणार आहे. या शोमध्ये सलमान खान होस्ट आहे. यावेळी त्याला एक विशेष पॉवर देण्यात आली आहे. या खास पॉवरनुसार बिग बॉसच्या पहिल्या आठवड्यातील स्पर्धकाला तो स्वतः बाहेर काढू शकतो. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जो स्पर्धक खराब कामगिरी करतोय असे सलमानला वाटेल तेव्हा तो त्याला घरातून बाहेर पडण्याचा इशारा देऊ शकतो. दुसरे म्हणजे दुसऱ्या स्पर्धकाला तो बाहेर पडण्यासाठी नॉमिनेटही करु शकतो. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी शक्ती होस्टला मिळाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details