महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सलमान खानची मुंबईतील घरी धावती भेट, काही तासातच परतला फार्म हाऊसवर - जॅकलिन फर्नांडिससोबत सलमान

सलमान खानने मंगळवारी मुंबईतील आपल्या घरी धावती भेट दिली. या दरम्यान त्याने आई वडिलांशी भेट घेऊन विचारपूस केली. रात्री तो पुन्हा पनवेलला परतला. लॉकडाऊनपासून गेली ६० दिवस तो पनवेल येथील फार्म हाऊसवर मुक्कामला आहे.

सलमान खान

By

Published : May 20, 2020, 3:36 PM IST

मुंबई- सलमान खान गेली ६० दिवस सेल्फ आयसोलेशनमध्ये पनवेलच्या फार्म हाऊसवर रहात आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून त्याने हेच आपले घर बनवले आहे. या दरम्यान त्याची आई वडिलांशी भेट झाली नव्हती. मंगळवारी त्याने मुंबईतील आपल्या घरी येऊन सलीम खान आणि सलमा खान यांची भेट घेतल्याचे समजते. तो आई वडिलांची विचारपूस करुन पुन्हा फार्म हाऊसवर परतला आहे.

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सलमान खान पनवेलमध्ये फार्म हाऊसवर होता. त्याच्यासोबत २० जण इथे होते. ते सर्वजण तिथेच रहात आहेत. या काळात तो आपल्या आई वडिलांच्या संपर्कात फोन आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यामातून आहे.

गृह मंत्रालयाने ३१ मे पर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या परवानग्या आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत सलमानने आपल्या मुंबईतील घरी धावती भेट दिली.

हेही वाचा -मराठमोठी 'अप्सरा' सोनाली ज्याच्या प्रेमात पडली तो कुणाल बेनोडीकर कोण आहे?

मिळालेल्या माहितीनुसार सलमानने वांद्रे येथील आपल्या गॅलक्सी अपार्टमेंटला मंगळवारी दिवसा धावती भेट दिली. त्याने काही तास घरी आई वडिलांसोबत घालवले. त्यानंतर तो रात्री पुन्हा पनवेलच्या फार्म हाऊसवर परतला.

सलीम खान हे मुंबईमध्ये लोकांना मदत करीत आहेत. या कार्यात कोणती अडचण येणार नाही, याची काळजी घेण्यासाठी सलमानने भेट दिल्याचे काहीजण सांगत आहेत.

सलमान जरी शहराच्या बाहेर असला तरी लोकांना सर्व प्रकारची मदत कशी करता येईल यासाठी तो प्रयत्नशील असतो. त्याने स्थानिक गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अन्नधान्य दान करण्याचे आवाहनही केले आहे.

सलमानने अलिकडेच 'तेरे बिना' हे गाणे रिलीज केले होते. याचे संपूर्ण चित्रण त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर पार पडलंय. यात सलमान आणि जॅकलिन फर्नांडिस यांची जोडी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हे गाणे त्याने स्वतः गायले असून व्हिडिओचे दिग्दर्शनही त्यानेच केलंय.

ABOUT THE AUTHOR

...view details