महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार चुलबुल पांडे, 'दबंग ३'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर - चुलबुल पांडे

सध्या राजस्थानमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. चित्रपटाच्या सेटवरून आत्तापर्यंत बरेच फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहे.

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार चुलबुल पांडे, 'दबंग ३'च्या प्रदर्शनाची तारीख जाहिर

By

Published : Aug 21, 2019, 1:56 PM IST

Updated : Aug 21, 2019, 2:12 PM IST

मुंबई -बॉलिवूडचा भाईजान सलमान खान गेल्या काही दिवसांपासून आपल्या 'दबंग ३' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. अनेकदा या चित्रपटाच्या सेटवरील फोटो आणि व्हिडिओ भाईजान आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असतो. या चित्रपटात सलमान खान 'चुलबुल पांडे' ही भूमिका साकारत आहे. 'दबंग' आणि 'दबंग २' दोन्ही चित्रपटातील 'चुलबुल पांडे' प्रेक्षकांना भावला होता. त्यामुळेच 'दबंग ३' मधुनही हाच चुलबुल पांडे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सलमान खानने 'दबंग ३'च्या प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे. हा चित्रपट याच वर्षी २० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनीही याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.

सध्या राजस्थानमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. चित्रपटाच्या सेटवरुन आत्तापर्यंत बरेच फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहे. तसेच, काही लूक देखील लिक झाले आहेत. त्यामुळे चुलबुल पांडे आणि रज्जोला भेटण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Last Updated : Aug 21, 2019, 2:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details