मुंबई- सुपरस्टार सलमान खानने गुरुवारी सांगितले की, बिग बॉस या रिअॅलिटी शोसोबत एक दशकाहून अधिक काळचा संबंध हा त्याचा "सर्वात दीर्घकाळाचा संबंध" आहे. या शोमध्ये तो दरवर्षी विश्वासाने परत येत राहतो. सलमान सध्या ऑस्ट्रियामध्ये त्याच्या आगामी अॅक्शन चित्रपट टायगर 3 चे शूटिंग करत आहे. 2010 पासून तो बिग बॉस शोशी संबंध ठेवून आहे.
कलर्स वाहिनीसाठी या शोच्या 15 व्या सीझनचे तो होस्टिंग करताना दिसणार आहे. या शोचा प्रीमियर 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे. शोची त्याच्यावर मजबूत पकड आहे आणि यामुळे त्याच्या आयुष्यात एक निश्चित परमनन्सी येते, असे त्याला वाटते.
बिग बॉसमध्ये आयुष्यात स्थायित्व मिळाले
"बिग बॉससोबत माझे नाते ... हे कदाचित माझे एकमेव नाते आहे जे इतके दिवस टिकले आहे. ते जाऊ द्या. (पण) बिग बॉसने माझ्या आयुष्यात एक निश्चित परमनन्सी आणली आहे. या चार महिन्याच्या काळात आम्ही एकमेकांना डोळ्यात डोळा घालून पाहात नसलो तरी सिझन संपल्यानंतर आम्ही पुन्हा एकत्र येण्यासाठी हतबल असतो.", असे सलमानने आपल्या संदेशात म्हटले आहे.
"स्पर्धकांना या वेळी मिळणाऱ्या सुविधा पूर्वीच्या तुलनेत कमी असतील. त्यांना फक्त एक लहानशी जगण्याची किट मिळेल पण बिग बॉसकडून त्यांना फटकारले जाईल, शिक्षा दिली जाईल, लक्झरी बजेट कमी केले जातील," असे सलमान खान म्हणाला.