मुंबई - दिग्दर्शक संजय लीला भन्साळी तब्बल २० वर्षांनंतर सलमान खानला घेऊन चित्रपट तयार करणार आहेत. त्यांच्या या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून सलमानसोबत आलिया भट्टची वर्णी लागली आहे.
आलिया भट्ट आणि सलमान खान दोघेही पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव 'ईन्शाल्ला' असे आहे. या दोघांनीही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत माहिती दिली आहे.
सलमान खान आणि आलिया एकत्र झळकणार असल्यामुळे चाहत्यांनाही या चित्रपटाची आतुरता आहे.
आलियाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललेली पाहायला मिळते. या वर्षात तिचे दोन बिग बजेट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापैकी 'कलंक' हा चित्रपट येत्या काही दिवसात प्रदर्शित होणार आहे. तर, 'ब्रम्हास्त्र' हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होईल.
काही दिवसांपूर्वीच तिचा 'गली बॉय' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 'बाहुबली'चे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या 'ट्रिपल आर'(RRR) या चित्रपटातही ती भूमिका साकारणार आहे.
आता सलमान खानसोबत 'ईन्शाल्ला' चित्रपटातही तिची वर्णी लागल्याने या चित्रपटाबाबत ती फार उत्सुक असल्याचे ट्विट तिने केले आहे.