हिंदी बिग बॉसमध्ये वादग्रस्त अभिजीत बिचुकले बराच गोंधळ घालत आहे. सतत कुणाची तरी कळ काढणे हा त्याचा स्वभाव आता बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना कळून चुकला आहे. यातील एक स्पर्धक देवोलिना भट्टाचार्जी हिच्याकडे त्याने चक्क चुंबन मागितल्यामुळे बिचुकले चर्चेत आला आहे.
देवोलिना भट्टाचार्जीकडे बिचुकले चुंबन मागितल्यानंतर ती प्रचंड भडली. तो असा कसा वागू शकतो म्हणत तिने खूप त्रागा केला. शो होस्ट करणाऱ्या सलमान खानलाही अभिजीत बिचुकलेचे हे वागणे आवडले नाही. याचा जाब सलमानने बिचुकलेला विचारला. त्यावेळी ऐटीत बसलेल्या बिचुकलेने ही माझी स्टॅटेजी होती असे म्हटले. यावर सलमानने त्याला खेडे बोल सुनावले.