मुंबई - बिग बॉसचा १३ वा सिझन २९ सप्टेंबरला सुरू होणार आहे. या शोमध्ये सलमान खान होस्ट आहे. यावेळी त्याला एक विशेष पॉवर देण्यात आली आहे. यामुळे या सिझनचे स्पर्धक त्याच्या इशाऱ्यावर नाचतील हे निश्चित झाले आहे.
'बिग बॉस १३' : सलमानला मिळाली 'दबंग पॉवर', इशाऱ्यावर नाचवणार स्पर्धक - Big Boss 13
'बिग बॉस १३' ची सुरूवात २९ सप्टेंबरला होणार आहे. हा सिझन अटीतटीचा होण्यासाठी सलमानला खास पॉवर देण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या इशाऱ्यावर स्पर्धकांना नाचण्या शिवाय आता पर्याय उरलेला नाही.
या खास पॉवरनुसार बिग बॉसच्या पहिल्या आठवड्यातील स्पर्धकाला तो स्वतः बाहेर काढू शकतो. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जो स्पर्धक खराब कामगिरी करतोय असे सलमानला वाटेल तेव्हा तो त्याला घरातून बाहेर पडण्याचा इशारा देऊ शकतो. दुसरे म्हणजे दुसऱ्या स्पर्धकाला तो बाहेर पडण्यासाठी नॉमिनेटही करु शकतो. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी शक्ती होस्टला मिळाली आहे.
'बिग बॉस 13' मध्ये यावेळी केवळ सेलेब्रिटी स्पर्धकच भाग घेऊ शकतील. सामान्य नागिकांना यात संधी नसेल. स्पर्धकांचा विचार करता यावेळी चंकी पांडे, अंकिता लोखंडे, राजपाल यादव, महिमा चौधरी, पारस छाब्रा, जीत चिराग पासवान, विजेंद्र सिंह, राहुल खंडेलवाल, हिमांशु कोहली, झरीन खान, दयानंद शेट्टी, सिद्धार्थ शुक्ला आणि दोबोलिना भट्टाचार्य यांची वर्णी लागू शकते.