मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने अमेरिकेच्या ह्युस्टनमध्ये होणारा लाईव्हा शो रद्द केला आहे. रेहान सिद्दीकीने आयोजित केलेला हा शो सोडून देण्याचा निर्णय सलमानने घेतला. रेहान हा पाकिस्तानी असून अमेरिकेत भारत विरोधी कृती करणाऱ्यांना फंडींग देत असल्याचा आरोपी आहे. सलमानच्या या निर्णयाचे सोशल मीडियावरुन भरपूर कौतुक होत आहे.
अमेरिकेतील लाईव्ह शो सलमानने केला रद्द, जाणून घ्या कारण?... - अमेरिकेतील लाईव्ह शो सलमानने केला रद्द
सलमान खानचा अमेरिकेत होणारा लाईव्ह शो रद्द झाला आहे. शो आयोजित करणारा रेहान हा पाकिस्तानी असल्याचे व तो भारत विरोधी आंदोलनास प्रोत्साहन देत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सलमानने हा निर्णय घेतला.
लाईव्ह शो सलमानने केला रद्द
रेहानने आजवर शेकडो शोंचे आयोजन केले आहे. यामध्ये मिका सिंग, पंकज उधास, रॅपर बादशाह, सैफ अली खान यांच्यासह तमाम बॉलिवूड कलाकार सहभागी झाले होते. मात्र अमेरिकेत भारत विरोधी गोष्टी करणाऱ्यांना त्यांनी आर्थिक मदत केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रेहानचा सीएए विरोधी अमेरिकेत प्रदर्शन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याची माहिती मिळताच सलमानने आपला शो रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.