मुंबई: अभिनेत्री साक्षी तंवर, 'कहानी घर घर की' आणि 'बड़े अच्छे लगते हैं' यासारख्या मालिकांमधून घराघरात लोकप्रिय आहे. आता लवकरच ती निर्माती एकता कपूरच्या 'एम.ओ.एम.-मिशन ओवर मार्स' या वेब सिरीजमध्ये झळकणार आहे. यात ती वैज्ञानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
महिला वैज्ञानिकाच्या अवतारात दिसणार साक्षी तंवर - Ekata Kapoor
अल्ट बालाजीचा हा शो चार महिला वैज्ञानिकांवर आधारित असेल. मंगळ गृहावर जाणाऱ्या भारतीय अंतराळ एजन्सीची पूर्ण तयारी या महिला वैज्ञानिक करताना दिसतील.
अल्ट बालाजीचा हा शो चार महिला वैज्ञानिकांवर आधारित असेल. मंगळ गृहावर जाणाऱ्या भारतीय अंतराळ एजन्सीची पूर्ण तयारी या महिला वैज्ञानिक करताना दिसतील. यात साक्षी, नंदिता ही व्यक्तीरेखा साकारणार आहे.
साक्षीने याबात बोलताना सांगितले, "'एम.ओ.एम..' वेब सिरीज ही महिलांवर आधारित आहे. अल्ट बालाजीने मला नंदिता हरिप्रसाद ही भूमिका साकारायची संधी दिली आहे. आयएसएची ती एक वरिष्ठ महिला वैज्ञानिक आहे. या सिरीजमध्ये मोना सिंह, निधि सिंह आणि पलोमी घोष मुख्य भूमिकेत आहेत."